Apurva Kulkarni
सई ताम्हणकर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. परंतु सईच्या वयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे.
सईने एका मुलाखतीत तिचा घटस्फोट, आणि घटस्फोटानंतरच्या पार्टीसंदर्भात घडलेला किस्सा शेअर केला आहे.
सई ताम्हणकरने व्हिज्युअल आर्टिस्ट अमेय गोसावीसोबत 2013 लग्न केलं होतं. परंतु 2015मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
सईने तिच्या नात्याबद्दल सांगाताना म्हटलं की, 'मी खूप वाईट नात्यात होते. त्यातून मी बऱ्याच गोष्टी शिकले.'
सई म्हणाली की, 'कोर्टातील सगळी घटस्फोटाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आम्ही ड्रिंक्स करायला बाहेर गेलो.'
'त्यावेळी आम्ही एकमेकांना सल्ले दिले, रडारड केली. मित्रांना बोलावलं. दारु पायलो आणि वेगळे झालो.'
सई आणि अमेय यांनी दोन वर्षातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता सईने करिअरकडे लक्ष केद्रिंत केलं आहे.