सकाळ डिजिटल टीम
बोल्ड बिनधास्त अशी ओळख असणाऱ्या सई ताम्हणकर प्रेक्षकांच्या मनात राज्य करत आहे.
सध्या सई महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाची परिक्षक भुमिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सई सोशल मीडियावर कायम आपल्या चाहत्यांना अपडेट्स देत असते.
सईने अनोख्या पद्धतीने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.
सईने पॅराग्लाइडिंग करत तिच्या नवीन वर्षाची सुरुवात केली आहे.
२०२५ वर्ष एक्सप्लोर करायचं आहे, असं तिने फोटोला कॅप्शन दिले आहे.
तिच्या या फोटोजवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
सईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत सुद्धा आपले पाय भक्कम रोवले आहेत.
सई लवकरच 'द सिक्रेट ऑफ द शिलेदार' या सीरिजमधुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.