Apurva Kulkarni
फॅशन असो वा अभिनय सई ताम्हणकर कायम तिच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतेय आणि पुन्हा एकदा सई नव्या बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये झळकणार आहे.
सई डब्बा कार्टेलच्या ट्रेलर लाँच साठी खास अंदाजात दिसली आणि तिच्या या लूक ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
या आधी देखील सईने अनेकदा कॉन्सेप्ट फोटोशूट केलं आहे आणि तिच्या या खास ओव्हरकोट लूकने पुन्हा ती चर्चेत आली आहे.
सई ने या ओव्हरकोट लूक मधून बॉस लेडी लूक क्रिएट केला आहे.
क्राइम बीट, मटका किंग, ग्राउंड झीरो अश्या अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट मधून सई या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होताना दिसतेय.
नेहमी विविध भूमिका साकारणारी सई ताम्हणकर नेटफ्लिक्सच्या 'डब्बा कार्टेल'मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत असून ती पोलीस निरिक्षक प्रीती जाधव ही भूमिका साकारताना दिसणार आहे.
बॉलिवुड मध्ये देखील सई ने तिच्या अभिनयातील वेगळेपणा जपत सातत्यपूर्ण काम सुरूच ठेवलं आहे.