सैफला झालेली थोरॅसिक स्पायनल कॉड दुखापत म्हणजे काय ? हे होऊ शकतात गंभीर परिणाम

kimaya narayan

सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानवर घरातच जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात अज्ञात चोराने त्याच्या पाठीत चाकू खुपसला.

Saif Ali Khan

मणक्याला दुखापत

या वारामुळे सैफच्या मणक्याला दुखापत झाली आहे. ज्याला वैद्यकीय भाषेत थोरॅसिक स्पायनल कॉड इंजुरी (Thoracic Spine Cord Injury) असं म्हटलं जातं.

Saif Ali Khan

थोडक्यात बचावला

या दुखापतीतून सैफ थोडक्यात बचावला आहे. डॉक्टरांना त्याच्या मणक्यात घुसलेलं सुरीचं पातं काढण्यात यश मिळालं आहे. पण जर त्याचा मणका फ्रॅक्चर झाला असता तर त्याचे परिणाम गंभीर असते.

Saif Ali Khan

मणका फ्रॅक्चर होण्याचे परिणाम

एखाद्या अपघातात तुमचा मणका फ्रॅक्चर झाला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्ही तुमची चालण्याचीही शक्ती गमावून बसू शकता.

प्रायव्हेट भाग संवेदनाहीन होणे आणि अनियंत्रण

मणका फ्रॅक्चर झाला तर तर गुप्तांग आणि गुद्वारावरील शरीराचं नियंत्रण नष्ट होतं. हे दोन्ही भाग संवेदनाहिन होतात. इतकंच नाही तर लघवी आणि शौचावरील नियंत्रण व्यक्ती गमावून बसू शकते.

पायाची शक्ती जाणे किंवा शरीरावरचे नियंत्रण जाणे

जर ही इजा गंभीर स्वरूपाची असेल तर शरीरावरील नियंत्रण नष्ट होते. माणूस चालताना पडू शकतो किंवा त्याच्या पायातील शक्ती कायमस्वरूपी जाऊ शकते.

सैफच्या मोलकरणीचा पगार किती ? - येथे क्लिक करा