कहाणी मे ट्वीस्ट! सायना नेहवाल - पारुपल्ली कश्यप पुन्हा जवळ आले?

Pranali Kodre

बॅडमिंटनमधील जोडपं

भारताचे बॅडमिंटनमधील जोडपं सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहेत.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

लग्न

सायना आणी पारुपल्ली कश्यप यांनी अनेक वर्षांच्या रिलेशनशीपनंतर २०१८ मध्ये लग्न केले होते.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

७ वर्षांनंतर विभक्त

मात्र, लग्नाच्या ७ वर्षांनंतर जुलै २०२५ मध्ये सायनाने ते दोघं विभक्त होत असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

धक्का

सायना आणि कश्यप अनेक वर्षांपासून एकत्र होते, पण अचानक त्यांनी विभक्त होत असल्याचे सांगितल्याने अनेकांना धक्का बसला होता.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

पुन्हा एकत्र

मात्र, त्यानंतर २ ऑगस्ट २०२५ रोजी सायनाने ते दोघं परत एकत्र येण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

फोटो

सायनाने कश्यपसोबतचा नवा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्यात दोघं आनंदी दिसत असून ते एका निसर्गरम्य ठिकाणी उभे असल्याचे दिसत आहेत.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

नवी सुरुवात

सायनाने हा पोटो शेअर करताना लिहिले की 'कधीकधी दुराव तुम्हाला एखाद्याच्या उपस्थितीची खरी किंमत शिकवतो. आम्ही पुन्हा एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय'

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

आनंद

सायना-कश्यप नातं निभावण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहेत, हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

Saina Nehwal & Parupalli Kashyap | Instagram

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ भारतीय! गिल 'या' क्रमांकावर

Shubman Gill | Sakal
येथे क्लिक करा