पुजा बोनकिले
‘सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्’ हा बहुचर्चित आरोग्य व वेलनेसचा महोत्सव ६ डिसेंबर पासून सूरू झाला आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या सुदृढ शारीरिक आरोग्यासह संतुलित आणि निरोगी जीवनशैलीसाठी तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आध्यात्मिक वक्ता जया किशोरी यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला आहे.
यामध्ये जया किशोरी यांनी मानसिक आरोग्य कसे निरोगी राहतील याबाबत खास माहिती दिली आहे.
आधुनिक युगात आध्यात्मिक असणे देखील गरजेचे आहे.
बाहेरून आल्यावर हात पाय धुवावे, ज्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि मानसिक आरोग्य निरोगी राहते.
सत्सगांला गेल्यावर नैराश्य येत नाही.
आयुष्यात स्थिरता गरजेची आहे.
इतरांशी तुलना करू नका.