Monika Shinde
वेतन आयोग ही केंद्र सरकार स्थापन केलेली संस्था आहे जी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर फायदे तपासते. आयोग आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सुधारणा सुचवतो.
Salary Commission
Esakal
महागाईमुळे कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती कमी होते. वेतन आयोग पगार वाढवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. आयोगाच्या शिफारशी लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनावर परिणाम करतात.
Salary Commission
Esakal
वेतन आयोग साधारणपणे दर १० वर्षांनी स्थापन केला जातो. पहिला आयोग १९४६ मध्ये झाला, आणि स्वतंत्र भारतात आतापर्यंत सात आयोग स्थापन झाले आहेत.
Salary Commission
Esakal
सातवा वेतन आयोग २०१४ मध्ये स्थापन झाला आणि २०१६ पासून त्याच्या शिफारशी लागू आहेत. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना याचा फायदा मिळतो.
Salary Commission
Esakal
वेतन आयोग फक्त पगार नाही, तर बोनस, भत्ते, निवृत्ती वेतन, पेन्शन आणि इतर आर्थिक फायदे देखील तपासते. त्यामुळे कर्मचारी कल्याणासाठी आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे.
Salary Commission
Esakal
सरकारला आयोगाच्या शिफारशी स्वीकारणे बंधनकारक नाही. मात्र बहुतेक वेळा कर्मचारी फायद्यासाठी या शिफारशी मान्य केल्या जातात.
Salary Commission
Esakal
आर्थिक परिस्थिती, सरकारी स्थिती, महागाई आणि कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेऊन आयोग पगार व फायदे सुधारतो.
Salary Commission
Esakal
आठवा वेतन आयोग २८ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजूर झाला आहे. 50 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
Salary Commission
Esakal