Apurva Kulkarni
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गायक सलीम मर्चेंट याने प्रतिक्रिया दिला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सलीम मर्चेंट यांनी 'मुस्लिम असल्याची लाज वाटत' असल्याची प्रतिक्रिया दिली.
सलीमने सांगितलं की, 'मुस्लिम धर्मात हिंसा शिकवली जात नाही. त्यामुळे हल्ला करणारे मुस्लिम नाही तर आतंकवादी होते.'
व्हिडिओ शेअर करत सलीमने सांगितलं की, 'कुरान-ए-शरीफ, सूरह अल-बकरा, आयत 256 मध्ये सांगितलं आहे की, धर्माबाबत कोणावरही जबरदस्ती नाही.'
पुढे सलीम म्हणाला की, 'मला लाज वाटते, एका मुस्लिम असून मला हे सगळं पहावं लागतंय. माझ्या हिंदू बहिण-भावांना किती वाईट पद्धतीने मारलं.'
'मला कळत नाहीय की, कसा मी माझा राग व्यक्त करू. पण ज्यांचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे की, ईश्वर त्यांच्या परिवाराला शक्ती देओ.'
सलीमसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी या दहशतवादी हल्ल्यावर राग व्यक्त केला आहे.