Salman Khan : 'तेरे नाम'पासून 'दबंग'पर्यंत भाईजानचे 'हे' आयकॉनिक लूक्स पाहाच..; जुन्या आठवणी होतील ताज्या!

सकाळ डिजिटल टीम

चाहत्यांना भुरळ घालणारा 'भाईजान'

सलमान खान म्हणजेच बॉलिवूडचा भाईजान. त्याचे चित्रपट जितके लोकप्रिय आहेत, तितकेच त्याचे वेगवेगळे लूकही चाहत्यांना भुरळ घालणारे आहेत.

Salman Khan Iconic looks

|

esakal

सलमानचे आयकॉनिक लूक

वर्षानुवर्षे सलमानने साकारलेल्या अनेक भूमिका आणि त्यातील त्याचे स्टाईल स्टेटमेंट्स आजही ट्रेंडमध्ये आहेत. पाहूया त्याचे ते पाच आयकॉनिक लूक, जे आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.

Salman Khan Iconic looks

|

esakal

सिकंदरचा ब्लॅक कुर्ता

सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झाला. यात सलमानने घातलेल्या काळ्या कुर्त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. ईदच्या आधीच अनेक दुकानांत ही डिझाईन संपल्याचे दिसून आले. सलमानचा हा लूक सुपरहिट ठरला होता.

Salman Khan Iconic looks

|

esakal

'तेरे नाम'ची हेअरस्टाईल

२००३ मध्ये आलेल्या ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमानची लांबलचक, माथ्यावर पडणारी हेअरस्टाईल त्या काळी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली होती. इतकेच नव्हे, तर अनेकांनी ही स्टाइल कॉपी करून ती काही काळ ट्रेंडमध्ये ठेवली. आजही हा लूक सलमानच्या सर्वाधिक चर्चित लूकपैकी एक आहे.

Salman Khan Iconic looks

|

esakal

'वॉन्टेड'चा भाईजान लूक

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉन्टेड’ नंतर सलमानची भाईजान इमेज अधिकच मजबूत झाली. त्याचा ब्रेसलेट, हेअरस्टाईल आणि टफ लूक तरुणांमध्ये वेड निर्माण करणारा ठरला. चित्रपटामुळे सलमानचा हा स्टाईल स्टेटमेंट आजही लोक आवडीने फॉलो करतात.

Salman Khan Iconic looks

|

esakal

'एक था टायगर'मधील अॅक्शन लूक

२०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ मध्ये सलमानचा मसल्सयुक्त, अॅक्शन-हिरो लूक चाहत्यांना खूप भावला. त्याचे जॅकेट, लोकरीचे स्कार्फ आणि दमदार बॉडी यामुळे हा लूक त्या काळी तरुणांचा फॅशन इन्स्पिरेशन बनला होता.

Salman Khan Iconic looks

|

esakal

'दबंग'मधील चष्म्याची स्टाईल

‘दबंग’ नंतर सलमान खानला ‘दबंग खान’ अशी ओळख मिळाली; पण सर्वाधिक व्हायरल झाले ते त्याचे चष्मा घालण्याचे अनोखे स्टाईल. शर्टच्या मागच्या कॉलरवर चष्मा टांगण्याची त्याची स्टाईल आजही लोक कॉपी करतात. या लूकचा प्रभाव इतका व्यापक होता की, तो तरुणांमध्ये आजही ट्रेंडिंग आहे.

Salman Khan Iconic looks

|

esakal

Karisma Kapoor : धक-धक गर्ल माधुरी दीक्षितच्या भीतीमुळे करिश्मा कपूरने नाकारला होता 'हा' चित्रपट!

Karisma Kapoor Rejected Movie

|

esakal

येथे क्लिक करा...