हळद लागली...अनंतसाठी राधिका सजली

अंकिता खाणे (Ankita Khane)

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. आता त्यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, रणवीर, सारा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळदी समारंभाला हजेरी लावली होती.

या हळदी समारंभामधील बॉलिवूड स्टार्स स्टाईलिश अंदाजात दिसले. या जोडप्याच्या हळदी समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हळदीच्या कार्यक्रमात रणवीर सिंग डोक्यापासून ते पायापर्यंत पिवळा रंगलेला दिसत आहे. त्याचा चेहराही हळदीनं पिवळा झाला होता.

हळदी कार्यक्रम अंबानींच्या अँटिलियामध्ये आयोजित करण्यात आला होता. सलमान खानही या कार्यक्रमात हळद खेळताना दिसला.

याशिवाय अंबानी कुटुंबातील सदस्यही हळदीच्या पिवळ्या रंगात रंगलेले दिसले.

मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी हे देखील अँटिलियाच्या बाहेर जाताना दिसले.

यावेळी टीना अंबानी देखील पिवळ्या रंगाच्या पोशाखात होती आणि तिच्या चेहऱ्यावर भरपूर हळद लावलेली होती.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

milk tea | sakal