kimaya narayan
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. जवळपास दोन वर्षांच्या अंतराने सलमानचा नवीन सिनेमा रिलीज होतोय.
सिकंदर असं सलमानच्या आगामी सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचं बजेट देखील खूप आहे.
नुकताच सिकंदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. रश्मिका मंदानाची या सिनेमात मुख्य भूमिका आहे.
पण सध्या सिनेमापेक्षा सिनेमाच्या तिकिटांची चर्चा सगळीकडे होतेय. प्रेक्षकांची वाढती मागणी पाहता अडवान्स बुकिंगही लवकरच फुल होणार असून तिकिटाचे दरही वाढले आहेत.
सिनेमाच्या रिलीजला दोन दिवस शिल्लक आहेत. मेट्रो शहरात या सिनेमाच्या तिकीटाची मागणी खूप आहे. त्यामुळे सिनेमाचं तिकीटही खूप महाग करण्यात आलं आहे.
मुंबई, दिल्ली सारख्या शहरामध्ये मल्टिप्लेक्समध्ये तिकीट जवळपास 2200 रुपये दराने विकलं जातंय. तर सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये तिकिटाचा दार 700 रुपये आहे. पण तरीही काही ठिकाणी तिकिटे स्वस्तात मिळत आहेत.
सलमानचा हा सिनेमा सुपरहिट होईल अशी आशा बॉलिवूड इंडस्ट्रीबरोबरच त्याच्या चाहत्यांनाही आहे.