चवीसाठी उत्तम, पण हृदयासाठी स्लो पॉयझन आहे 'हा' पदार्थ!

Aarti Badade

मीठ आणि तुमचे हृदय

मीठ पदार्थाची चव वाढवते, पण त्याचे अतिसेवन तुमच्या हृदयासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकते.

Salt Side Effects heart and high bp

|

Sakal

सोडियमचे वाढते प्रमाण

सलॅड किंवा फळांवर वरून मीठ टाकणे, लोणची, चिप्स आणि पॅकेज्ड स्नॅक्समुळे शरीरात सोडियमचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढते, ज्याचा थेट परिणाम हृदयावर होतो.

Salt Side Effects heart and high bp

|

Sakal

रक्तदाबाचा थेट संबंध

मिठातील सोडियम रक्तातील पाणी साठवून ठेवते (Water Retention). यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते आणि रक्तवाहिन्यांवर ताण येऊन उच्च रक्तदाब (High BP) निर्माण होतो.

Salt Side Effects heart and high bp

|

Sakal

रक्तवाहिन्यांना इजा

दीर्घकाळ उच्च रक्तदाब राहिल्याने रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींना इजा होते. यामुळे रक्तवाहिन्या अरुंद व कडक होतात, ज्याला 'अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस' असे म्हणतात.

Salt Side Effects heart and high bp

|

Sakal

हृदयविकाराचा धोका

रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. उच्च रक्तदाब हा अनेकदा कोणतीही लक्षणे न दाखवता वाढतो.

Salt Side Effects heart and high bp

|

Sakal

किती मीठ खावे?

जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एका प्रौढ व्यक्तीने दिवसाला केवळ ५ ग्रॅम (एक टीस्पूनपेक्षा कमी) मीठ खाणे सुरक्षित आहे. मात्र, तयार पदार्थांमुळे अनेक जण नकळत दुप्पट मीठ खातात.

Salt Side Effects heart and high bp

|

Sakal

आजच नियंत्रण ठेवा!

हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी वरून मीठ घेणे टाळा आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा. मीठ नियंत्रणात ठेवणे हाच दीर्घायुष्याचा मंत्र आहे.

Salt Side Effects heart and high bp

|

sakal

रात्रीची झोप लागत नाही? सारखी जाग येते? 'या' टिप्स फॉलो करा!

Best food for sleep

|

Sakal

येथे क्लिक करा