Anuradha Vipat
काही महिन्यांपूर्वी समंथाने तिच्या लग्नाच्या गाऊनला कात्री लावत त्यापासून नवीन ड्रेस बनवला होता.
नाग चैतन्यसोबतच्या ख्रिश्चन लग्नात समंथाने जो गाऊन परिधान केला होता त्याला तिने वेगळं रुप दिलं होतं.
गयामागील कारण समंथाने एका मुलाखतीत सांगितलं होतं .
समंथा म्हणाली की, मी असं का केलं यामागचं कारण म्हणजे मला खरंच त्या गाऊनला एक वेगळं रुप द्यायचं होतं आणि सुरुवातीला मला त्रास नक्की झाला होता.
समंथा म्हणाली की, मला वेदना जाणवत होत्या पण मी त्यापासून नवीन काहीतरी बनवण्याचा निर्णय घेतला. होय माझा घटस्फोट झाला आहे.
समंथा म्हणाली की, गोष्टी परीकथेसारख्या नाहीत पण याचा अर्थ असा नाही की एका कोपऱ्यात बसून त्याबद्दल रडत बसावं आणि आयुष्यात पुन्हा कधीच आनंदाने जगू नये
लग्नाच्या गाऊनला कात्री लावून त्यापासून वेगळा ड्रेस बनवण्यामागे काही सूड वगैरे नव्हता असंही सामंथा यावेळी म्हणाली