संभाजी महाराजांनी आषाढीला केली होती विठ्ठलाची पहिली महापूजा?

संतोष कानडे

पालखी सोहळा

औरंगजेबाच्या आक्रमणामुळे महाराष्ट्रातील पालखी सोहळे आणि हिंदू रितीरिवाजांवर मोठ्या प्रमाणात हल्ले होत होते.

नारायण महाराज

१६८० मध्ये तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराजांकडे पालखीला संरक्षणाची मागणी केली.

संभाजी महाराजांचा ऐतिहासिक निर्णय

संभाजी महाराजांनी पंढरपूरपर्यंत पालखीला संरक्षण दिले, आणि त्याच वेळी आषाढी एकादशीस विठोबाची महापूजा करण्याचा निर्णय घेतला.

नारायण महाराजांचे निमंत्रण

नारायण महाराजांनी राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना पंढरपूरच्या विठोबाची महापूजा करण्याचे निमंत्रण दिले आणि संभाजी महाराजांनी ते स्वीकारले.

सुधाकर महाराज इंगळे

सुधाकर महाराज इंगळे यांनी एका बखरीचा आधार घेत, संभाजी महाराजांनी आषाढीला पहिल्यांदाच विठोबाची महापूजा केली असा दावा केला.

सदानंद मोरे

तुकोबांचे वंशज सदानंद मोरे यांनी कुठेही असा संदर्भ सापडत नसल्याचे 'सकाळ'ला सांगितले.

आषाढी एकादशी

छत्रपती संभाजी महाराजांनी आषाढी एकादशीला विठोबाची महापूजा करून एक ऐतिहासिक व धार्मिक परंपरेची सुरुवात केली, असं म्हटलं जातं.

इतिहास

परंतु या ऐतिहासिक सत्यतेबाबत साशंकता आहे. कारण प्रमाणभूत इतिहासामध्ये त्याचे संदर्भ सापडत नाहीत.

विठोबाची मूळ मूर्ती खरंच पंढरपूरमध्ये नाही?

<strong>येथे क्लिक करा</strong>