Shubham Banubakode
24 ऑगस्ट 1680 रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वामी बाकरे यांना 10 हजार सोन्याचे होन आणि संस्कृत भाषेतील दानपत्र प्रदान केले.
या दानपत्रात संभाजी महाराजांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या दोन ओळी आहेत, ज्या त्यांच्या स्वतःच्या लेखनशैलीचे दर्शन घडवतात.
दानपत्रातील दोन ओळींचा मजकूर सांगतो की, “शिवराज पुत्र म्हणजे शिवाजी महाराजांचं संभाजी राजा यांनी हे लिहिलेले मान्य आहे.”
दानपत्रात भोसले कुळाच्या चार पिढ्यांचा समावेश आहे, ज्यामुळे हे पत्र ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून अत्यंत महत्त्वाचे आहे.
संभाजी महाराजांनी आपले वडील, पुण्यश्लोक शहाजीराजांचा उल्लेख “हिंदुधर्मजीर्णोद्धारक” असा केला आहे.
दानपत्रात संभाजी महाराजांनी अफजलखान वधाचे आणि शाहिस्तेखानाला केलेल्या शासनाचं वर्णनही केले आहे.
हे दानपत्र शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सात वर्षांनी लिहिले गेले.
दानपत्र संस्कृत भाषेत लिहिले गेले आहे, जे त्या काळातील राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व दर्शवते.
हे दानपत्रातील ओळी संभाजी महाराजांनी स्वतः लिहिल्यामुळे त्याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.