Shubham Banubakode
छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ मुले होती. यामध्ये दोन मुले आणि सहा मुलींचा समावेश होता.
म्हणजेच संभाजी महाराजांना एकूण सात भावंडे होती. यापैकी १ भाऊ आणि ६ बहिणी होत्या. यापैकी तीन सख्या तर तीन सावत्र बहिणी होत्या.
सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दीपाबाई, राजकुंवरबाई शिर्के आणि कमळाबाई पालकर अशी संभाजी महाराजांच्या बहीणींची नावे होती.
यापैकी सखुबाई, राणूबाई आणि अंबिकाबाई या संभाजी महाराजांच्या सख्ख्या बहिणी होत्या, तर दीपाबाई, राजकुंवरबाई आणि कमळाबाई या सावत्र बहिणी होत्या.
राजाराम महाराज हे संभाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. राजाराम महाराजांचा जन्म सोयराबाई यांच्या पोटी झाला होता.
तर संभाजी महाराज हे महाराणी सईबाई यांचे पुत्र होते. अशा प्रकारे शंभूराजांना एकूण सात भावंडे होती.