Shubham Banubakode
छत्रपती संभाजी महाराज हे वीर योद्धा तर होतेच, शिवाय ते उत्तम साहित्यिकही होते.
संभाजी महाराज यांनी नायिकाभेद, नखशीख, आणि सातसतक असे ब्रज भाषेतील ग्रंथ लिहिले.
याशिवाय संभाजी महाराजांनी वयाच्या १७व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथही लिहिला.
हा ग्रंथ संस्कृतमध्ये असून यात तीन अध्याय, ६५ प्रकरणं आणि ८८६ श्लोक आहेत.
मात्र, हा बुधभूषण ग्रंथ आता नेमका कुठं आहे? तुम्हाला माहितीये का?
संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ सर्वप्रथम डॉ. भाऊ दाजी लाड यांना सापडला होता.
डॉ. भाऊ दाजी लाड हे त्वचारोग तज्ज्ञ होते. त्यांना भारत भ्रमणादरम्यान काही हस्तलिखीत मिळली होती.
या हस्तलिखीतांमध्ये बुधभूषण हा ग्रंथही होता.
ही हस्तलिखीतं पुढे मुंबईतील रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये ठेवण्यात आली.
यात बुधभूषण या ग्रंथाचाही समावेश होता. आजही त्याची प्रत रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये उपलब्ध आहे