सकाळ डिजिटल टीम
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नेहमीच एक घट्ट नाते राहिले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटूच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीने टीम इंडियाच्या कर्णधारासाठी धर्म बदलला..
संगीता बिजलानी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या प्रेमात पडली होती.
मोहम्मद अझरुद्दीनचं आधी लग्न झालेलं असतानाही संगीता बिजलानी त्याच्या प्रेमात पडली होती.
१९८५ साली एका जाहिरातीच्या शूटिंगमध्ये ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडली
मोहम्मद अझरुद्दीनचे पहिले लग्न नौरीनशी झाले होते आणि त्यांना दोन मुलं आहेत.
संगीता १९९६ मध्ये अझरुद्दीनसोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली, त्याचवर्षी तो पहिल्या पत्नीसोबत विभक्त झाला.
अझरुद्दीनशी लग्न करण्यासाठी संगीताने प्रथम इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव आयेशा बेगम असे बदलले.
हे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघेही २०१० मध्ये वेगळे झाले.