Pranali Kodre
दिग्दर्शक आणि कोरियोग्राफर असलेली फराह खान आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा खूप चांगल्या मैत्रीणी आहे. त्यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे.
नुकतेच फराह खानने तिच्या युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती सानियासोबत गप्पा मारताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये सानिया आणि शोएब मलिक यांचा मुलगा इझहानही दिसत आहे. गेल्यावर्षी सानिया आणि शोएब यांचा घटस्फोट झाला आहे.
इझहान साडेसहा वर्षांचा आहे. त्याचा जन्म ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला आहे.
या व्हिडिओमध्ये इझहानच्या जन्मानंतर फराह त्याला काय म्हणाली होती, याचा खुलासाही सानियाने केला आहे.
व्हिडिओमध्ये इझहान फराहला तिच्या सोफ्याला च्युइंग गम चिकटवू का, असं म्हणत चिडवत होता.
त्यावेळी ती त्याला म्हणाली, विसरू नको मी तुला लाँच करणार आहे, तू माझा हिरो आहे.
त्यावेळी सानियाने यामागील कारण सांगितले. ती म्हणाली, जेव्हा फराह इझहानला पाहायला पहिल्यांदा आली होती, तेव्हा तिने त्याला १० रुपये दिले होते आणि त्याला म्हणाली होती की मी तुला लाँच करणार आहे.
त्यावर फराह म्हणाली की मी किमान १०० रुपये तरी दिले असतील.
दरम्यान, नंतर फरहाने इझहानला फुटबॉल भेट दिला.