Ashok Jawale
कादंबरी, कथा, कविता आणि नाटक अशा वेगवेगळ्या साहित्यकृतींनी संजय लीला भन्साळी यांच्या सहा गाजलेल्या चित्रपटांना प्रेरणा दिली आहे.
शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'देवदास' या कादंबरीवर शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या भूमिका असलेला २००२ मधील 'देवदास' चित्रपट आधारित आहे.
रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांच्या 'सांवरिया' या २००७ मधील चित्रपटाला रशियन लेखक फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या 'White Nights' या साहित्यकृतीचा आधार आहे.
रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाचा आधार ना. स. इनामदार यांच्या मराठी 'राऊ' कादंबरीत आहे.
'पद्मावत' हा मलिक मुहम्मद जायसी यांचा महाकाव्यात्मक पद्यग्रंथ असून, त्यावरून प्रेरणा घेऊन भन्साळींनी 'पद्मावत' चित्रपट तयार केला
आलिया भट्टची भूमिका असलेला 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट एस. हुसैन जैदी आणि जेन बोर्गेस यांच्या 'Mafia Queens of Mumbai' या पुस्तकातील एका प्रकरणावर आधारित आहे.
'गोलियों की रासलीला राम-लीला' हा चित्रपट विल्यम शेक्सपिअर यांच्या 'Romeo and Juliet' या नाटकावर आधारित असल्याचे भन्साळी यांनी स्वतः सांगितले आहे.
या चित्रपटांमधून भन्साळींनी कादंबरी, कथा, ऐतिहासिक प्रेमकथा, काव्य आणि नाटक अशा विविध साहित्यप्रकारांना स्वतःच्या चित्रपटशैलीतून पडद्यावर आणले आहे.
Old Name of Mumbai
Sakal