संतोष कानडे
सोशल मीडियात प्रसिद्ध असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांनी आणखी एक अलिशान कार खरेदी केली आहे.
निर्मला शुभम नवले यांनी जेव्हा रेंज रोवर कार खरेदी केली तेव्हा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला होता.
त्यानंतर त्यानंतर त्यांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत या गाडीच्या खरेदीचा किस्सा सांगितला होता.
त्यांचे पती शुभम नवले हे त्यांना मागेल ती गोष्ट कशी देतात, याबद्दल त्या सांगत होत्या. त्यामुळे त्यांचा 'इफ आय वॉन्ट इट..' हा डायलॉग व्हायरल झालेला.
त्यानंतर आता याच सरपंच मॅडमने नवीकोरी कार खरेदी केली आहे. याचे फोटो खुद्द त्यांनीच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
निर्मला नवले यांनी खरेदी केलेली कार ही Mahindra BE6 ही आहे. काळ्या रंगातली ही इलेक्ट्रिक व्हेईकल आहे.
या कारची किंमत साधारण २२ ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. त्यांचे पती त्यांचा हट्ट कायम पुरवतात.
निर्मला नवले ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. पक्षाने त्यांच्यावर युवती आघाडीची जबाबदारी दिलेली आहे.
रेंज रोवरनंतर आता महिंद्रा कारचेही फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर नवले यांचे 514K फॉलोअर्स आहेत.