IPL मधील 12 वर्षांच्या कारकि‍र्दीत सॅमसनने पहिल्यांदाच केला 'हा' कारनामा

प्रणाली कोद्रे

पंजाब किंग्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 65 व्या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्सला पाच विकेट्सने पराभूत केलं.

RR vs PBKS | X/IPL

संजू सॅमसनचा विक्रम

पण असं असलं तरी या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने एका वैयक्तिक विक्रमाला गवसणी घातली आहे.

Sanju Samson | Rajasthan Royals | Sakal

संजू सॅमसन@500

संजू सॅमसन या सामन्यात 15 चेंडूत 18 धावा करूनच बाद झाला. मात्र या खेळीदरम्यान त्याने आयपीएल 2024 मध्ये 500 धावांचा टप्पा पार केला.

Sanju Samson | Rajasthan Royals | Sakal

आयपीएल 2024 मधील कामगिरी

संजू सॅमसनच्या आता आयपीएल 2024 मध्ये 13 सामन्यांमध्ये 5 अर्धशतकांसह 504 धावा झाल्या आहेत.

Sanju Samson | Rajasthan Royals | Sakal

पहिलीच वेळ

त्यामुळे सॅमसनने पहिल्यांदाच एका हंगामाच 500 धावांचा टप्पा पार केला आहे.

Sanju Samson | X/IPL

गेल्या 11 वर्षात जमलं नव्हतं

सॅमसन गेली 12 वर्षे म्हणजेच 2013 पासून आयपीएल खेळत आहे, परंतु, यापूर्वी झालेल्या 11 हंगामांमध्ये त्याला एकदाही 500 धावांचा टप्पा पार करता आला नव्हता.

Sanju Samson | X/RajasthanRoyals

यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी

सॅमसनने यापूर्वी 2021 आयपीएलमध्ये सर्वाधिक 484 धावा केल्या होत्या.

Sanju Samson | X/RajasthanRoyals

सातव्यांदा 350 धावा पार

सॅमसनने त्याच्या 12 वर्षांच्या आयपीएल कारकि‍र्दीत 7 वेळा 350 धावांचा टप्पा पार केला आहे.

Sanju Samson | X/IPL

क्रश...प्रपोज....अन् स्माईल; गंभीरच्या इन्स्टा पोस्टनं विषयच संपवला!

Gautam Gambhir | KKR Fan | Sakal