संजू सॅमसनने मोडला रोहित शर्मा, विराट कोहलीचा मोठा विक्रम!

Pranali Kodre

भारताने वेस्ट इंडिजला केलं पराभूत

टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत १ मार्च रोजी भारतीय संघाने सुपर-८ च्या सामन्यात वेस्ट इंडिजला ५ विकेट्सने पराभूत केले.

Sanju Samson

|

Sakal

भारतीय संघ उपांत्य फेरीत

कोलकाताला झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने उपांत्य फेरीतही प्रवेश केला.

Sanju Samson

|

Sakal

संजू सॅमसनची ९७ धावांची खेळी

भारताच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा मोठा वाटा होता. त्याने ५० चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९७ धावांची खेळी केली.

Sanju Samson

|

Sakal

संजू सॅमसनचा विक्रम

त्यामुळे संजू सॅमसन आता टी२० वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वोच्च धावांची खेळी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Sanju Samson

|

Sakal

रोहितला टाकले मागे

त्याने रोहित शर्माला मागे टाकले आहे. रोहितने २०२४ टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावांची खेळी केली होती.

Rohit Sharma

|

Sakal

चौथा क्रमांक

तसेच या यादीत चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. ज्याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर नाबाद ८९ धावांची खेळी केली होती.

Virat Kohli

|

Sakal

पाचवा क्रमांक

तसेच २०२६ टी२० वर्ल्ड कपमध्येच अमेरिकेविरुद्ध सूर्यकुमार यादवने नाबाद ८४ धावा केल्या होत्या. ही या यादीतील पाचव्या क्रमांकाची खेळी आहे.

Top 5 Individual Scores for India in T20 World Cup

|

Sakal

अव्वल क्रमांक

या यादीत अव्वल क्रमांकावर सुरेश रैना असून त्याने २०१० टी२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची शतकी खेळी केली होती. टी२० वर्ल्ड कपमधील हे भारताचे एकमेव शतक आहे.

Suresh Raina

|

Sakal

विंडीज देश नाही, पण क्रिकेट सामन्याआधी राष्ट्रागीतावेळी त्यांच्यासाठी कोणतं गाणं वाजतं?

West Indies Cricket Anthem

|

Sakal

येथे क्लिक करा