विंडीज देश नाही, पण क्रिकेट सामन्याआधी राष्ट्रागीतावेळी त्यांच्यासाठी कोणतं गाणं वाजतं?

Pranali Kodre

वेस्ट इंडिज संघ

क्रिकेटमध्ये खेळणारा वेस्ट इंडिज संघ हा कोणत्या एका देशाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर कॅरेबियन बेटांवर बसलेल्या विविध देशांचे एकत्रित प्रतिनिधित्व करतो.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

कॅरेबियन बेटांचा संघ

या संघाकडून जमैका, बार्बाडोस, गयाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो अशा अनेक बेटांवरील देशांतील खेळाडू खेळतात.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

क्रिकेट अँथम

त्यामुळे त्यांना कोणत्या एका देशाचे राष्ट्रगीत वाजता येत नाही. अशावेळी त्यांच्यासाठी एक विशिष्ट क्रिकेट अँथम वाजवलं जातं.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

अधिकृत गीत

'Rally 'Round the West Indies' असं या गीताचं नाव आहे. हे गाणं वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने त्यांचे अधिकृत गीत म्हणून स्वीकारलं आहे.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

गाण्याचे गीतकार

त्रिनिदादचे प्रसिद्ध गायक डेव्हिड रडर यांनी १९८७ मध्ये हे गाणं लिहिलं आणि संगीतबद्ध केलं होतं.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

१९९९ पासून सुरुवात

१९९९ पासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपासून हे गाणं वेस्ट इंडिज संघाचं अधिकृत गीत म्हणून सामन्याच्या आधी वाजण्यास सुरुवात झाली.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

मुळ गाण्यातील शब्द बदलले

दरम्यान, क्रिकेटसाठी मुळ गाण्यातील काही ओळी आणि शब्द बदलण्यात आले होते. पण अद्यापही हेच गाणं वेस्ट इंडिजच्या सामन्याआधी त्यांच्यासाठी वाजवलं जातं.

West Indies Cricket Anthem

|

Sakal

रणजी ट्रॉफी विजेत्या जम्मू-काश्मीरला BCCI किती कोटींचे बक्षीस मिळणार?

Jammu & Kashmir Cricket Team

|

Sakal

येथे क्लिक करा