Shubham Banubakode
संत श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज सोहळा आज पार पडतो आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरामधून लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत.
टाळ-मृदंग आणि विठुनामाच्या नामघोषाने देहूनगरी दुमदुमली आहे.
मात्र, देहूत ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं जन्म झाला, ते ठिकाण तुम्ही बघितलंय का?
इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू ग्राम हे तुकाराम महाराजांचे जन्मगाव आहे.
संत तुकाराम महाराजांचं जन्मस्थान देहूतील विठोबा रखुमाई संस्थानापासून जवळच आहे.
हे जन्मस्थान मंदिर म्हणजेच तुकोबांचे राहते घर होते. यामुळेच ते मंदिर घराप्रमाणे दिसते.
याठिकाणी प्रवेश केल्यावर आपल्याला एक छोटेखानी लाकडी सभामंडप आहे.
याचं बांधकाम ७० वर्षापूर्वी वैकुंठगमन त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त करण्यात आलं होतं.
इथून समोरच तुकाराम महाराजांच्या वंशजांची निवासस्थाने आहेत.
सभामंडपातून पायऱ्या चढून गेल्यावर गाभारा लागतो. इथे तुकाराम महाराजांची मूर्ती आहे.