औरंगजेबाला धडकी भरवणाऱ्या संताजी घोरपडे यांचे वंशज कुठे आहेत अन् काय करतात?

Saisimran Ghashi

सरसेनापती संताजी घोरपडे

संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सेनापती होते. त्यांचे घोरपडे घराणे छत्रपती भोसले घराण्याचे चुलत घराणे आहे.

santaji ghorpade story | esakal

घोरपडे घराण्याचे मूळ

संताजी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मूळ मेवाडच्या सिसोदिया राजपूत घराण्यात आहे. त्यांचे पूर्वज कर्णसिंह आणि भिमसिंह भोसले बहामनी साम्राज्यात नोकरी करत होते.

santaji ghorpade shivaji maharaj | esakal

'राजा घोरपडे बहाद्दूर' किताब

भिमसिंह भोसले यांनी खेळणा किल्ला जिंकला आणि त्यामध्ये कर्णसिंह यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांना 'राजा घोरपडे बहाद्दूर' हा किताब मिळाला. यामुळे घराण्याचे आडनाव घोरपडे ठेवले गेले.

santaji ghorpade descendants | esakal

म्हाळोजी घोरपडे यांचा पराक्रम

म्हाळोजी घोरपडे यांनी स्वराज्याची सेवा केली आणि १६८९ मध्ये मुकर्रबखानाच्या छावणीतून संभाजी महाराजांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांना अपयश आले.

santaji ghorpade descendants | esakal

स्वराज्याची सेवा

संताजी घोरपडे यांना छत्रपती राजाराम महाराजांनी "ममलकतमदार" हा किताब दिला. त्यांचे शौर्य आणि कर्तृत्व स्वराज्याच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण ठरले.

santaji ghorpade story | esakal

संताजी-धनाजीची जोडी

संताजी घोरपडे आणि धनाजी यांनी गनिमी काव्याचा वापर करून मुघल साम्राज्यात धुमाकूळ घातला. त्यांनी एकदा औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला केला.

who was santaji ghorpade | esakal

संताजी घोरपडे यांचा मृत्यू

संताजी घोरपडे यांचे छत्रपती राजाराम महाराजांशी मतभेद झाले आणि त्यातच मुघल सरदार नागोजी माने याने त्यांची हत्या केली.

santaji ghorpade death | esakal

संताजी घोरपडे घराण्याचा दरारा

संताजी घोरपडे घराण्याचा दरारा आजही कर्नाटकमध्ये कायम आहे आणि या घराण्याचे वंशज आजही गौरवाने जगतात.

santaji ghorpade descendants karnataka | esakal

घोरपडे घराण्याचे वंशज

संताजी घोरपडे घराण्याचे वंशज मुख्यतः कर्नाटकमधील गजेंद्रगड आणि सोंडूर येथे आहेत. ते त्या भागातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असतात.

santaji ghorpade descendants now | esakal

शंभूराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ कोण? कुठे राहतात त्यांचे वंशज

shambhuraje Dharau Gade Patil story | esakal
येथे क्लिक करा