शंभूराजांना दूध पाजणाऱ्या धाराऊ कोण? कुठे राहतात त्यांचे वंशज

Saisimran Ghashi

छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेताच मराठी माणसाच्या अंगात हत्तीच बळ येत त्या शंभू राजांच्या बालपणाची एक गोष्ट आहे

शंभूराजांचा जन्म

14 मे 1657 ला पुरंदर गडावर शंभू राजांचा जन्म झाला, पण त्यांच्या आई सईबाई त्यावेळी आजारी पडल्या.

आईचे दूध

नुकत्याच जन्मलेल्या तान्ह्या बाळाला आईचे दूध देखील नव्हते

esakal

धाराऊ गाडे

तेव्हा जिजाऊनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापुरहोळ गावातील तुकोजी गाडे पाटील यांच्या पत्नीस निरोप पाठवून गडावर बोलावले. त्यांना सगळी परिस्थिति सांगितली.

esakal

शंभूराजांना दूध प्राशन

नुकत्याच बाळंत झालेल्या धाराऊंनी त्यांच्या पोटच्या मुलासोबतच शंभू राजांना देखील दूध पाजले.

esakal

सईबाईंचा मृत्यू

सईबाईंच्या मृत्यूनंतरदेखील धाराऊंनी बालपणात शंभू राजांचा सांभाळ केला

esakal

16 होणाची तैनाती

छत्रपती शिवाजी महाराजांनी धाराऊंना दरवर्षी 16 होणाची तैनाती करून दिली आणि त्यांच्या मुलांना स्वराज्याच्या सेवेत घेतले.

esakal

धाराऊंचे वंशज

शंभू राजांना आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जगवणाऱ्या धाराऊंचे वंशज आजही कापूरहोळ गावात राहतात.

esakal

माऊलीची आठवण

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान आपण सर्व जाणतो. पण त्यांना बालपणी जीवन देणाऱ्या माऊलीचा विसर पडता कामा नये.

esakal

झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

rani lakshibai descendants | esakal
येथे क्लिक करा