Apurva Kulkarni
अभिनेत्री सारा अली खान सध्या चर्चेत आहे. कारण तिने लग्नातील फोटो शेअर केले आहेत.
सारा अली खानच्या हातावरील मेंहदीवर त्रिशूल आणि ओम लिहिलेलं आहे. तर उजव्या हातावर 'जय भोलेनाथ' लिहिलं होतं.
साराने मित्राच्या लग्नातील काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
साराने लाल रंगाची साडी आणि केस बांधलेले आहेत. गळ्यातील चोकर तिला उठून दिसत आहे.
मित्र यश सहगल नवरदेवाच्या रुपात पाहून साराचा आनंद गगनात मावत नव्हता.
साराने वेगवेगळ्या पोज देऊन फोटो काढला आहे. चाहत्यांना तिचे फोटो फार भावले आहेत.
साराने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, 'मिस्टर अँड मिसेस सिंग' आणि दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.