Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेचा तिसरा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर १४ डिसेंबरपासून सुरू झाला आहे.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसामुळे मोठा व्यत्यय आला.
हा सामना पहिल्याच सत्रात दोनवेळा पावसामुळे थांबला होता.
पण, या सामन्याच्या पहिल्याच दिवशी सचिन तेंडुलकरची लेक सारानेही सर्वांचे लक्ष वेधले.
सारा तेंडुलकर या सामन्यासाठी द गॅबा स्टेडियमवर उपस्थित होती. तिचे स्टेडियममधील फोटोही व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, ती स्टेडियममध्ये उपस्थित असल्याने सोशल मीडियावर पुन्हा तिच्या आणि भारतीय फलंदाज शुभमन गिलच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.
यापूर्वीही अनेकदा सारा आणि शुभमनचे नाव एकमेकांशी जोडण्यात आले आहे. दरम्यान, यावर दोघांकडूनही कोणतेही भाष्य करण्यात आलेलं नाही.
साराला काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या डायरेक्टर पदावर नियुक्त करण्यात आले आहे.