सकाळ डिजिटल टीम
सचिन तेंडुलकरची मैदानावर तसेच मैदानाबाहेरही आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे.
आपल्या 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन' संस्थेमार्फत तो अनेक सामजिक कार्य करताना दिसतो.
सचिनने मुलगी साराची 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डिरेक्टर म्हणून घोषणा केली.
सचिन तेंडुलकर फाऊंडेशनतर्फे (SRT) गरीब आणि गरजू लहान मुलांसाठी आरोग्य सेवा पुरवली जाते.
तसेच गरजू लहान मुलांच्या आरोग्य, क्रीडा, शिक्षण यासाठी ही संस्था काम करते.
साराने युनिवर्सिटी कॉलेज लंडन येथून क्लिनिकल अँड पल्बिक हेल्थ न्युट्रीशन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
साराने काही मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या आहेत.
तिचा स्वत:चा ऑनलाईन बिझनेसही आहे. तिच्या ऑनलाईन स्टोअरचे नाव 'सारा तेंडुलकर शॉप' असे आहे.