सकाळ डिजिटल टीम
सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकरने कमी काळात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवली आहे.
ती सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह व चर्चेत असते.
नुकतीच सारा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जावून आली आणि सोशल मीडियाद्वारे तिने चाहत्यांनाही आस्ट्रेलिया दर्शन घडवले.
महिन्याभरापूर्वी साराने सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या डिरेक्टर पदाची जबाबदारी स्वीकारली.
त्याचबरोबर सारा आपला ऑनलाईन बिझनेसही सांभाळते.
'सारा तेंडुलकर शॉप' नावाचे तिचे ऑनलाईन स्टोअर आहे.
तिने लंडन युनिवर्सिटीतून क्लिनिकल अॅंड पब्लिक हेल्थ न्यूट्रीशन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
साराने काही मोठ्या ब्रॅंड्ससाठी जाहीराती देखील केल्या आहेत.
साराने आपल्या इंस्टाग्राम हॅंडलवरून गोल्डन ड्रेसमधील फोटोज पोस्ट केले आहेत.