Pranali Kodre
सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही एक लाईफस्टाईल इनफ्लूएन्सरही आहे. ती सध्या 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डिरेक्टर म्हणून कामही करते.
सारा हिने युनिवर्सिटी कॉलेज लंडन येथून क्लिनिकल अँड पल्बिक हेल्थ न्युट्रीशनमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे तिच्या आहाराबाबत काळजी घेतानाही दिसते.
साराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर तिचे सिक्रेट ड्रिंक असलेली मॅचा स्मूदीची रेसिपी शेअर केली आहे.
तिच्या मॅचा स्मूदीमध्ये ३० ते ३५ ग्रॅम प्रोटीन आहे, असं तिने सांगितले आहे. तसेच त्वचेला नैसर्गिक ग्लो देणारे आणि स्नायूंना बळकट करणारे हे ड्रिंक असल्याचेही ती सांगते
खजूर (गरजेनुसार २-३), १ स्कूप व्हॅनिला प्रोटीन पावडर, १ स्कूप कोलेजन पेप्टाइड्स, १ चमचा मॅचा पावडर, १ कप सारखमुक्त बदामाचं दूध, १-२ चमचं बदामाचं बटर, बर्फ
खजूर, व्हॅनिला प्रोटीन पावडर, कोलेजन पेप्टाइड्स, मॅचा पावडर, बदामाचं दूध, बदामाचं बटर हे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवावं. त्यानंतर स्मूदी तयार होते.
ग्लासमध्ये बर्फ टाकून त्यात फिक्सरमध्ये फिरवून तयार केलेली स्मूदी टाकल्यानंतर ती तुम्ही पिऊ शकता.
सारा म्हणते, या हे हेल्दी ड्रिंक असून यात अँटिऑक्सिंडंट, फायबर आणि प्रोटिन आहे. बदामाच्या बटरमुळे व्हिटॅमिन ई देखील मिळते. ही स्मूदी दिवसभरासाठी शरीराला स्थिर ऊर्जा प्रदान करते.