Pranali Kodre
यशस्वी जैस्वालने २०२४ वर्षे गाजवले आहे. त्याची कसोटीतील कामगिरी, तर अफलातून झाली.
त्यामुळे त्याने मोठा विक्रमही केला आहे. जैस्वाल २०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या टॉप-५ फलंदाजांमध्ये आहे.
जैस्वालने २०२४ वर्षात १५ कसोटी सामन्यांमध्ये २९ डावात १४७८ धावा केल्या आहेत. यात ३ शतके आणि ९ अर्धशतके आहेत.
तो २०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रुटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जो रुटने २०२४ वर्षात १७ सामन्यांतील ३१ डावात सर्वाधिक १५५६ धावा केल्या आहेत. त्याने ६ शतके आणि ५ अर्धशतके केली आहेत.
२०२४ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बेन डकेट असून त्याने १७ सामन्यांतील ३२ डावात ११४९ धावा केल्या आहेत, ज्यात २ शतके आणि ६ अर्धशतके आहेत.
चौथ्या क्रमांकावर हॅरी ब्रुक असून त्याने २०२४ वर्षात १२ सामन्यांतील २० डावात ४ शतके आणि ३ अर्धशतकांसह ११०० धावा केल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा कामिंडू मेंडिस आहे. त्याने २०२४ वर्षात ९ सामन्यांतील १६ डावात १०४९ धावा केल्या आहेत, ज्यात ५ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
केन विलियम्सन सहाव्या क्रमांकावर असून त्याने २०२४ वर्षात ९ सामन्यांतील १८ डावात ४ शतके आणि ४ अर्धशतकांसह १०१३ धावा केल्या आहेत.