Pranali Kodre
भारताचा क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. तो फिट राहण्यासाठी त्याच्या आहारात योग्य आणि गरजेच्या गोष्टी घेतो.
काही रिपोर्ट्सनुसार विराटच्या आहारात ड्रॅगन फ्रुटचा देखील समावेश आहे.
ड्रॅगन फ्रुट हे काटेरी असून त्याचे वेगवेगळे प्रकार देखील आहे. त्यानुसार त्याची किंमत ठरले.
साधारण १७० ते ४०० रुपयांना एक किलो अशी या फळाची किंमत आहे. या ड्रॅगन फ्रुटचे अनेक फायदेही आहेत, ते जाणून घेऊ
ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. तसेच अँटीऑक्सिडंट्समुळे कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशनही रोखले जाते.
ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन C मुळे आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
फायबरयुक्त ड्रॅगन फ्रूट पचनक्रिया सुधारते, त्याचबरोबर बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
ड्रॅगन फ्रुट वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते.
व्हिटॅमिन C मुळे कोलेजन वाढते, ज्यामुळे त्वचा टवटवीत आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच सुरकुत्या कमी होतात.
ड्रॅगन फ्रुटमध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे हाडे मजबूत राहतात. ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
ड्रॅगन फ्रुटमधील फायबरमुळे साखरेचे शोषण हळू होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.