सकाळ वृत्तसेवा
सचिन तेंडुलकरने सप्टेंबर २०१९ मध्ये सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची त्याची पत्नी डॉक्टर अंजलीसह स्थापना केली.
सचिन तेंडुलकरने SRTF च्या संचालकपदी सारा तेंडुलकरची निवड केली आहे आणि सचिनने नुकतीच ही घोषणा केली होती.
साराने तिची एक वेगळी ओळखही बनवली आहे. तिने काही मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या आहेत. तसेच तिचा स्वत:चा ऑनलाईन बिझनेसही आहे.
तिच्या ऑनलाईन स्टोअरचे नाव 'सारा तेंडुलकर शॉप' असे आहे. तिने मॉडलिंगलाही सुरुवात केली होती.तिने आईप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेतले आहे.
साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथून क्लिनिकल अँड पल्बिक हेल्थ न्युट्रीशन या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सारा ब्रिस्बेनमध्ये दिसली होती आणि तिचे फोटो व्हायरल झाले होते.
दरम्यान साराचा ऑस्ट्रेलियातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि सोशल मीडियावर तो गाजतोय...
सारा तेंडुलकर या व्हिडीओत क्यूट दिसतेय, परंतु तो व्हायरल होण्याचं कारण वेगळंच आहे.
सारा या व्हिडीओत चेरी हवेत फेकून ती टिपण्याचा प्रयत्न करतेय आणि पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले आहे. दुसऱ्या प्रयत्नात ती यशस्वी झाली.