Pranali Kodre
भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला.या सामन्यात भारताने फॉलोऑन थोडक्यात टाळला.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४४५ धावांना प्रत्युत्तर देताना भारताने चौथ्या दिवस अखेर २५२ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया १९३ धावांनी आघाडीवर आहे.
दरम्यान, अनेकांना असा प्रश्न पडला असेल की कोणताही संघ प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन देऊ शकतो, हे कसे समजते? तर त्यासाठी काही नियम आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे फॉलोऑन हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येच दिला जातो.
जर पाच दिवसांचा खेळ असेल, तर जर एखाद्या संघाने प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध २०० हून अधिकची आघाडी घेतली, तर आघाडी घेणारा संघ फॉलोऑन देऊ शकतो.
समजा ए संघाने बी संघाविरुद्ध ४०० धावा केल्या. त्यानंतर बी संघाने २०१ धावा केल्या, तर ए संघ त्यांना फॉलोऑन देऊ शकत नाही, पण जर बी संघाच्या २०० धावा झाल्या, तर ए संघ बी संघाला फॉलोऑन देऊ शकतो.
याशिवाय जर तीन किंवा चार दिवसांचा सामना असेल, तर १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तर फॉलोऑन दिला जाऊ शकतो.
तसेच २ दिवसांचा खेळ असेल, तर १०० धावांच्या आणि एका दिवसाचाच सामना झाला, तर ७५ पेक्षा जास्त आघाडी झाली तरत फॉलोऑन दिला जातो.
दरम्यान, जो संघ फॉलॉऑन देणार आहे, त्याने याबाबत आधी प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला आणि अंपायर्सला याबाबत कल्पाना देणे अपेक्षित असते. तसेच हा निर्णय नंतर बदलला जाऊ शकत नाही.