Pranali Kodre
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तिचं करियर सांभाळण्यासोबतच तिची प्रवासाची आवडही अनेका जपताना दिसते.
जगभरातील विविध ठिकाणी ती फिरायला जात असते, त्याचे फोटो आणि व्हिडिओही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
ती आता नुकतीच ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलेली आहे.
यादरम्यान ती ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस हेडनला भेटली आहे.
या दोघींनी एकत्र फिरण्याचा आनंदही घेतला. ग्रेस सारासाठी तिची ड्रायव्हरही झाली होती आणि तिला फिरवत होती. त्यांचे व्हिडिओ साराने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
ग्रेस हेडन ही न्यूज अँकर आहे आणि ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.
सारा तेंडुलकर काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर फाऊंडेशनची डायरेक्टर झाली आहे. ती या फाउंडेशनचं काम पाहात आहे.