Pranali Kodre
भारतीय कसोटी संघाने श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटी जिंकली. पण मैदान गाजवलं ते देवदत्त पडिक्कल आणि मानव सुथार या दोन युवा खेळाडूंनी.
Devdutt Padikkal - Manav Suthar
Sakal
अवघ्या २४ वर्षांच्या मानव सुथारने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ अशा एकूण १० विकेट्स घेतल्या.
Manav Suthar
Sakal
मानव सुथार परदेशात १० विकेट्स घेणारा सर्वात युवा भारतीय फिरकीपटू ठरलाय.
Manav Suthar
Sakal
मानव सुथारचं पदार्पण अफगाणिस्तानविरुद्ध जून २०२६ मध्ये रवींद्र जडेजाच्या जागेवर झालं होतं.
Manav Suthar
Sakal
त्यानं पहिल्याच सामन्यात ७ विकेट्ससह सामनावीर पुरस्कार जिंकत आपलं नाणं खणखणीत वाजवलं होतं.
Manav Suthar
Sakal
त्यानं त्याच्या पहिल्या दोनच कसोटीत १७ विकेट्स घेतल्यात.
Manav Suthar
Sakal
आत्ताही श्रीलंकेविरुद्ध संघात जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा असे खेळाडू संघात असतानाही त्यांच्यात मानवने आपलं वेगळे पण सिद्ध केलंय.
Manav Suthar
Sakal
डावखुरा फिरकीपटू असलेला मानवकडे फलंदाजीतही खालच्या फळीत योगदान देण्याची क्षमता आहे. अशात आता तो जडेजा आणि कुलदीप यादव यांना पर्याय ठरू शकतो.
Kuldeep Yadav - Ravindra Jadeja
Sakal
जडेजा त्याच्या कारकिर्दीच्या आता शेवटच्या टप्प्यात आहे, तर कुलदीपलाही आता प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवताना बऱ्याचदा विचार होतो. अशात मानव सुथारची कामगिरीने त्यांच्यासमोरील आव्हान आणखीनच कठीण केलं आहे.
Manav Suthar
Sakal
त्यातच कर्णधार शुभमन गिलनंही त्याच्यावर विश्वास दाखवताना तो आश्वासक खेळाडू असून भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो असंही म्हटलं आहे.
Manav Suthar
Sakal
त्यामुळे मानव सुथारला आता सातत्याने कसोटी संघात खेळवलं जाईल, याचे संकेत मिळाले आहेत.
Manav Suthar
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Virat Kohli Debut
Sakal