Monika Shinde
यंदा वट पौर्णिमा १० जूनला साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमा हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे
या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास केला जातो. या सणाच्या दिवशी परिधान करण्यासाठी काही रंग शुभ मानले जातात, तर काही रंग टाळावेत, असे मानले जाते.
लाल रंग हा लक्ष्मी मातेचा रंग मानला जातो आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. लाल रंगाची बनारसी साडी वटपौर्णिमेसाठी उत्तम पर्याय आहे.
हिरवा रंग हा समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. गडद हिरव्या रंगाची साडी परिधान केल्यास सौंदर्यात भर पडते.
पिवळा रंग हा ज्ञान, आनंद आणि शुभतेचे प्रतीक आहे. भगवान विष्णूला पिवळा रंग प्रिय आहे, त्यामुळे या रंगाची साडी परिधान करणे शुभ मानले जाते.
गुलाबी रंग हा प्रेम आणि सौम्यता दर्शवतो. गुलाबी रंगाची साडी परिधान केल्यास सौंदर्यात भर पडते.
केशरी आणि भगवा रंग हे शौर्य, पवित्रता आणि सेवा दर्शवतात. या रंगाची साडी परिधान केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळते.