राहुल शेळके
सातारा शहर थोरल्या शाहू महाराजांनी वसवले. मराठ्यांच्या साम्राज्याची ही राजधानी सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाची होती.
१७०८ साली शाहू महाराज छत्रपती झाले, तेव्हा त्यांनी थेट हे शहर वसवण्याचा निर्णय घेतला. त्याआधी तिथे कोणतेही गाव नव्हते.
सातारा हे मराठ्यांचे पहिलेच नियोजित शहर ठरले. ते गाव किंवा वस्तीतून विकसित झाले नाही, तर थेट शहर म्हणून उदयास आले.
शाहू महाराजांनी साताऱ्यात सोमवार, मंगळवार, सदाशिव पेठ, माची पेठ आणि केसरकर पेठ अशा अनेक व्यापारी पेठा वसवल्या.
शहराच्या विकासात बसवंत आप्पा कासुरडे (बसाप्पा खोजे) यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या नावानेही एक पेठ वसवण्यात आली.
सन १७१५ सालीच शाहू महाराजांनी साताऱ्यात कालव्यांच्या मदतीने पाणीपुरवठा सुरू केला. हे पुणे आणि कोल्हापूरपेक्षा कितीतरी वर्षे आधी झाले.
राजसपुरा, व्यंकटेशपुरा, चिमणपुरा, रघुनाथपुरा अशा अनेक नवीन वस्त्या तयार झाल्या, ज्यामुळे शहराचा विस्तार झाला.
सातारा शहर इतके सुरक्षित होते की, शाहू महाराजांनी ५०,००० सैन्य लगेच गोळा करता येईल अशी तयारी ठेवली होती.
१७०८ ते १७४९ या काळात सातारा शहरावर कधीही हल्ला झाला नाही. रायगड, पुणे यांवर हल्ले झाले, पण सातारा नेहमी सुरक्षित राहिले.
शिवकाळानंतर सातारा हे फक्त मराठ्यांचेच नाही तर देशाचेही महत्त्वाचे राजकीय केंद्र बनले.