स्ट्रेचरवर तान्ह्या बाळासह बाळांतीण, समोर पतीचं पार्थिव…; साताऱ्यातील जवानाच्या मृत्यूने महाराष्ट्र स्तब्ध

सकाळ डिजिटल टीम

साताऱ्यात जवानाचा दुर्दैवी मृत्यू

सातारा : पत्नीच्या प्रसुतीसाठी रजेवर गावी आलेल्या सातारा तालुक्यातील आरेदरे गावचे जवान प्रमोद परशराम जाधव यांचा दुचाकी आणि पिकअप वाहनाच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

हृदयद्रावक घटनेने सातारा हळहळला

या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण आरेदरे गावासह सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जवान प्रमोद जाधव यांच्यावर शनिवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह

आरेदरे गावचे सुपुत्र प्रमोद जाधव यांचा अवघ्या वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीला प्रसुतीसाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे पत्नीची काळजी घेण्यासाठी ते आठ दिवसांच्या रजेवर गावी आले होते.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

डोक्याला गंभीर दुखापत झाली अन्...

शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वाढे फाट्याकडून साताऱ्याकडे येत असताना जुन्या आरटीओ कार्यालय चौकात प्रमोद जाधव यांच्या दुचाकीची पिकअप वाहनाशी जोरदार धडक झाली. या अपघातात रस्त्यावर फेकले गेल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

लेकीला पाहण्यासाठी बापाच जगात नव्हते!

दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी सकाळी प्रमोद जाधव यांच्या पत्नीची प्रसुती झाली. त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, आपल्या लेकीला पाहण्यासाठी आणि तिचे पहिले रडणे ऐकण्यासाठी वडील या जगात नव्हते. या कटू वास्तवाने सर्वांचे डोळे पाणावले.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

वैद्यकीय उपचारानंतर प्रमोद जाधव यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी आरेदरे गावातील स्मशानभूमीत शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश

अखेरचा निरोप देण्यासाठी प्रसुतीनंतर पत्नीला तान्ह्या बाळासह स्ट्रेचरवरून आणण्यात आले. पतीचे पार्थिव पाहताच पत्नीने केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून गेला. त्या क्षणाने अंत्यसंस्काराला उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

गावाने जड अंतःकरणाने दिला निरोप

आरेदरे ग्रामस्थांनी आपल्या जवान सुपुत्राला जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला. या अपघाताची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून उपनिरीक्षक शंकर गायकवाड पुढील तपास करत आहेत.

Satara Jawan Death Road Accident

|

esakal

Gold Investment : सोन्यात गुंतवणूक करण्याची 'ही' पद्धत ठरू शकते महाग; 99 टक्के लोकांना याची कल्पनाही नाही!

Gold Investment

|

esakal

येथे क्लिक करा...