Varsha Balhe
स्पेनमधील सेटेनिल दे लास बोदेगास या शहरात अनेक घरं मोठमोठ्या नैसर्गिक खडकांच्या खाली बांधलेली आहेत.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
या शहरात लोकांनी डोंगराच्या नैसर्गिक कपारींचा वापर करून घरं बांधली आहेत. त्यामुळे घरांच्या छतावर चक्क अवाढव्य खडक दिसतात.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
मोठे खडक छत आणि मागच्या भिंतीचं काम करतात. त्यामुळे घर बांधताना लोकांना फक्त पुढच्या बाजूच्या भिंती आणि दरवाजे तयार करावे लागतात.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
या मोठ्या खडकांमुळे घरांचं तापमान नियंत्रित राहतं. उन्हाळ्यात घरात थंडावा राहतो, तर हिवाळ्यात बाहेरच्या थंडीपासून संरक्षण मिळतं.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
खडकांच्या खाली घरं असली तरी आत प्रकाश आणि हवा येण्यासाठी खिडक्या, झरोके आणि वायुवीजनाची व्यवस्था केली जाते.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
शहरातील कॅले क्यूवास डेल सोल आणि कॅले क्यूवास दे ला सोम्ब्रा हे रस्ते प्रसिद्ध आहेत. येथे खडकांच्या खाली रेस्टॉरंट्स, कॅफे आणि दुकानं आहेत.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
या शहरात शेकडो वर्षांपासून लोक राहत आहेत. निसर्गाने तयार केलेल्या अवाढव्य खडकांचा वापर करून त्यांनी आपली घरं आणि संपूर्ण वस्ती उभी केली आहे.
Setenil de las Bodegas Rock Houses
esakal
underground city
esakal