Pranali Kodre
साताऱ्याच्या मातीतून आलेल्या साहिल जाधवने आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेत (Asian Games) भारतासाठी दोन गोल्ड मेडल जिंकलेत.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
चिकीथा तानीपार्थीसोबत त्यानं कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात थरारक शूट-ऑफमध्ये सुवर्णपदक जिंकलं.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
त्यानंतर काही तासात त्यानं पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात सर्व तीर अचूक मारत कुशल दलाल आणि थिरुमुरु गणेश मणिरत्नमसोबत चीनला हरवून सुवर्णपदक जिंकलं.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
पण हे सुवर्णपदक फक्त साहिलच्या मेहनतीचं नाही, तर त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या त्यागाचंही फळ आहे.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
साहिलने तिरंदाजीची सुरुवात साताऱ्यातील वाई येथे झालेल्या एका समर कॅम्पमधून केली. त्याला या खेळात रस निर्माण झाल्यानंतर आई-वडिलांनीही मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळं केलं.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
सुरुवातीला लाकडी धनुष्याने सराव करणाऱ्या साहिलल पुढे कंपाऊंड बोसाठी मोठ्या खर्चाची गरज होती.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
त्यावेळी मुलाचं स्वप्न थांबू नये म्हणून त्याच्या आईने स्वतःचे दागिने विकले आणि साहिलसाठी नवीन कंपाऊंड बो घेतला.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
एवढंच नाही, तर कोरोनाच्या काळात साहिलच्या वडिलांची नोकरी गेल्याने तीन-चार महिने घरात कमाईचा एकमेव आधार आईची शिक्षिकेची नोकरी होती.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
त्याला जुन्या बाणांनी सराव करताना पाहून वडिलांनी हार न मानण्याचा सल्ला दिला.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
पुढे साहिलच्या मेहनतीमुळे त्याची निवड कोलकात्यातील नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये झाली आणि त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
त्यानंतर त्याने २०२४च्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, त्यानंतर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक रौप्यपदक जिंकलं.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
२०२६च्या सुरुवातीला शांघाय वर्ल्ड कपमध्येही त्याने कांस्यपदक जिंकलं अन् आता थेट एशियन गेम्सचे दोन गोल्ड मेडल आणि चिकितासह कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात ऑलिम्पिक २०२८ साठी पात्रताही मिळवली.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
साहिलच्या या यशामुळे आईने विकलेले दागिने आणि वडिलांनी सोसलेला संघर्ष सार्थ ठरलाय.
Satara's Archer Sahil Jadhav Gold Medal
Sakal
Virat Kohli - Rohit Sharma
Sakal