साताऱ्यातलं एक गाव जिथं रात्री सात नंतर कोणीच घराबाहेर पडत नाही?

Sandip Kapde

भयावह वास्तव

सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य जंगलाच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा गावात निसर्गसौंदर्यासोबतच वन्यप्राण्यांची भीतीही ग्रामस्थांच्या आयुष्याचा भाग बनली आहे.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

संचारबंदी

या गावात संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ग्रामस्थांना घराबाहेर पडण्याची हिंमत होत नाही, कारण अंधार पडताच परिसरात वन्यप्राण्यांचा वावर वाढतो.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

अस्वलांचा वावर

गावाच्या परिसरात अस्वलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, रात्रीच्या वेळी अस्वल थेट वस्तीत शिरत असल्याने ग्रामस्थांना सतत सावध राहावे लागते.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

जीवघेणा हल्ला

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी अस्वलांच्या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, एका भीषण हल्ल्यात गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

वाहतुकीची अडचण

गावातून बाहेर पडण्यासाठी पुरेशी वाहतूक व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करून मुख्य रस्त्यावर जावे लागते किंवा खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागतात.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

आरोग्यसेवेचा अभाव

गावात दवाखान्याची पुरेशी सोय नसल्याने एखादी व्यक्ती गंभीर आजारी पडल्यास किंवा रात्री आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास साताऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

शिक्षणावर परिणाम

वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे गावातील शाळा बंद पडल्या असून, चौथीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या या गावात आता मोजकीच मुले शिल्लक राहिली आहेत.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

शेतीचे नुकसान

शेती हा गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार असला तरी गवे, अस्वल आणि इतर वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती करणे बंद करावे लागले आहे.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

आर्थिक संकट

स्वतःच्या मालकीची जमीन, बोअरवेल आणि शेतीसाठी केलेली गुंतवणूक असूनही वन्यप्राण्यांच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही, परिणामी त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

असुरक्षित जीवन

रात्रीच्या वेळी मंदिरात जाणे, शेतात काम करणे किंवा अचानक घराबाहेर पडणेही धोकादायक बनले असून, वन्यप्राण्यांपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांना खिशात फटाके आणि काडेपेटी ठेवावी लागते.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

गाव सोडण्याची वेळ

शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि सुरक्षितता अशा मूलभूत सुविधांचा अभाव कायम राहिल्यास आगामी काळात संपूर्ण गाव ओस पडण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

प्रशासनाकडे मागणी

जाधव उंबरी ग्रामस्थांची मागणी एवढीच की, सुरक्षित रस्ते, आरोग्य सुविधा आणि वन्यप्राण्यांपासून संरक्षण मिळावे, जेणेकरून गावात व शेतीत निर्भयपणे जगता येईल.

Fear and uncertainty grip a remote village in Satara as wildlife threats disrupt everyday life.

|

esakal

महाराष्ट्राबाहेरचं शिवरायांचं हे घर पाहिलंत का? 

Chhatrapati Shivaji Maharaj House

|

esakal

येथे क्लिक करा