सतत ढेकर येणे सामान्य आहे का? कधी घ्यावी डॉक्टरांची मदत?

Aarti Badade

सतत ढेकर येतात?

शरीर देत असलेला हा संकेत दुर्लक्षित करू नका!

burp

|

Sakal

पचनाशी संबंधित

जेवणानंतर ढेकर येणे सामान्य असले तरी दिवसभर वारंवार ढेकर येत असतील तर त्यामागे पचनाशी संबंधित कारण असू शकते.

burp

|

Sakal

पोटात जास्त हवा

घाईघाईने जेवणे, जेवताना बोलणे, च्युइंगम चघळणे किंवा स्ट्रॉने पेय पिण्यामुळे पोटात जास्त हवा जाऊ शकते.

burp

|

Sakal

वारंवार ढेकर

सोडा, स्पार्कलिंग वॉटर आणि इतर कार्बोनेटेड पेयांमुळे पोटात वायू वाढून वारंवार ढेकर येऊ शकतात.

burp

|

Sakal

पोट फुगण्याचा त्रास

ॲसिड रिफ्लक्स, अपचन, गॅस किंवा गॅस्ट्रायटिस यांसारख्या समस्यांमुळेही ढेकरांसोबत छातीत जळजळ आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

burp

|

Sakal

पोट फुगण्याचा त्रास

दूध किंवा काही विशिष्ट पदार्थ शरीराला न पचल्यास त्यानंतर गॅस आणि ढेकरांचा त्रास वाढू शकतो.

burp

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

तीव्र पोटदुखी, उलट्या, गिळण्यास त्रास, वजन कमी होणे किंवा रक्ताची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

burp

|

Sakal

छातीत दुखणे

ढेकरांसोबत छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याला केवळ गॅस समजून दुर्लक्ष करू नका.

burp

|

Sakal

ग्लोइंग स्किनसाठी बेसन-हळद सोडा, ट्राय करा हा फेस पॅक!

Glowing Skin Face Pack

|

Sakal

येथे क्लिक करा