'गोलंदाजांना वाचवा', आर अश्विनने असं का म्हणाला?

प्रणाली कोद्रे

पंजाब किंग्सचा विजय

पंजाब किंग्सने आयपीएल 2024 स्पर्धेतील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 8 विकेट्सने विजय मिळवला.

KKR vs PBKS | X/IPL

अश्विनच्या पोस्टने वेधलं लक्ष

या सामन्यादरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने एक्सवर (Twitter) केलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले.

R Ashwin | X/IPL

262 धावांचे आव्हान

खरंतर या सामन्यात कोलकाताने तब्बल 262 धावांचे आव्हान पंजाब समोर ठेवले होते.

KKR | X/IPL

पंजाबने आव्हान केलं पूर्ण

या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबकडूनही जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग यांनी जोरदार फटकेबाजी केली. ज्यामुळे पंजाबने 19 षटकातच 262 धावा पूर्ण केल्या.

Jonny Bairstow | X/IPL

सर्वात मोठा विजय

धावांचा पाठलाग करताना मिळवलेला हा टी20 क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.

Shashank Singh | X/IPL

अश्विनची पोस्ट

दरम्यान, या सामन्यात ज्या वेगाने धावा निघत होत्या, ते पाहून अश्विनने ट्वीट केले की 'गोलंदाजांना कोणीतरी कृपया वाचवा.'

R Ashwin Post | X

विचार करायला लावणारी पोस्ट

खरंतर यंदाच्या हंगामात सातत्याने 200 च्या वर धावा निघताना दिसल्या आहेत. हे पाहाता अश्विनचे हे ट्वीट विचार करायला लावणारे आहे.

R Ashwin | X/IPL

T20 World Cup: 'हे' संघ खेळणार सेमीफायनल, युवराजची भविष्यवाणी

Yuvraj Singh | T20 World Cup | X/ICC