किडन्या दीर्घकाळ निरोगी ठेवायच्या आहेत? मग जीवनशैलीत करा 'हे' बदल!

Aarti Badade

शरीरातील नैसर्गिक गाळणी

किडनी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून रक्त शुद्ध करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य २४ तास करत असते.

Save Your Kidneys

|

Sakal

मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित ठेवा

भारतात किडनी फेल होण्याची मुख्य कारणे 'डायबिटीस' आणि 'हाय ब्लड प्रेशर' हीच असल्याने वर्षातून किमान एकदा तरी तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

Save Your Kidneys

|

Sakal

इंटरनेटवरील अर्धवट माहिती टाळा

किडनीशी संबंधित समस्या असल्यास इंटरनेटवरच्या माहितीपेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांच्या (Nephrologist) सल्ल्यावरच पूर्ण विश्वास ठेवा.

Save Your Kidneys

|

Sakal

एकाच डॉक्टरवर विश्वास ठेवा

किडनीचे आजार दीर्घकाळ व्यवस्थापनाची गरज असलेले असतात, त्यामुळे वारंवार डॉक्टर बदलल्याने उपचारात अडथळे येऊ शकतात.

Save Your Kidneys

|

sakal

रिपोर्ट पाहून घाबरू नका

आज वैद्यकीय क्षेत्रात प्रगत उपचार उपलब्ध असल्याने रिपोर्ट्स खराब आले तरी घाबरून न जाता डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने परिस्थिती हाताळा.

Save Your Kidneys

|

Sakal

संतुलित आहार आणि व्यायाम

ब्लड शुगर आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर औषधे घेणे किडनीसाठी वरदान ठरते.

Save Your Kidneys

|

Sakal

जीवनाची गुणवत्ता जपा

वेळेवर निदान आणि निरोगी जीवनशैलीमुळे किडनीचे आजार टाळता येतात, अगदी गंभीर स्थितीतही डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटसारखे पर्याय उपलब्ध आहेत.

Save Your Kidneys

|

Sakal

चेहरा ग्लोइंग अन् सॉफ्ट हवाय? आठवड्यातून 2 वेळा लावा 'ही' पेस्ट!

Beetroot face pack for glowing skin

|

Sakal

येथे क्लिक करा