पुजा बोनकिले
सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. तसेच समाज सुधारक आणि कवी होत्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात झाला.
सावित्रीबाई फुले यांचे वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिबाराव यांच्याशी लग्न झाले.
सावित्रीबाई फुले यांनी पतीसोबत मिळून १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
त्यांनी एकून १८ शाळा सुरू केल्या.
मुलांना शिक्षण पुर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यास सुरूवात केली.
१९ व्या शतकात त्यांना महिला हक्क आणि शिक्षणाचा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
सावित्रीबाई फुले यांनी १० मार्च १८९७ रोजी अखेरचा श्वास घेतला. १९८८मध्ये भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी केले