Aarti Badade
अनेकांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य हवंय. त्यासाठी आजारांपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं.
आजारांपासून दूर राहण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सची गरज नाही, सोपे बदल पुरेसे!
औषधोपचार आणि उपचारांशिवायही दीर्घायुष्य कसं मिळवायचं, जाणून घ्या.
संतुलित आहार शरीरावर चांगला परिणाम करतो. निरोगी अन्न खाल्ल्याने शरीर आणि मन चांगले कार्य करते.
जास्त वजन अनेक आजारांना आमंत्रण देतं (हृदयरोग, मधुमेह). त्यामुळे वजन नियंत्रित ठेवा.
जास्त वेळ बसल्याने हृदयरोगांचा धोका वाढतो. कामातून वेळ काढून थोडे उठा, फिरा.
व्यायामामुळे तुम्ही फिट राहता आणि तुमचा मूडही सुधारतो. निरोगी राहण्यासाठी रोज थोडा व्यायाम आवश्यक.
दीर्घायुष्यासाठी ७-८ तासांची चांगली झोप खूप महत्त्वाची. झोपेने शरीर दुरुस्त होते आणि मनाला विश्रांती मिळते.