Aarti Badade
सुंदर, काळे, जाड आणि लांब केसांसाठी तुरटीचा वापर खूप फायदेशीर ठरू शकतो.
तुरटी टाळूसाठी अत्यंत गुणकारी आहे. ती डोक्यातील कोंडा, खाज सुटणे आणि केस गळणे थांबवण्यास मदत करते.
तुरटी लावल्याने केस लगेच वाढणार नाहीत, पण ती टाळूला निरोगी ठेवते, जे सुंदर केसांसाठी महत्त्वाचे आहे.
एक छोटा तुकडा तुरटी किंवा एक चमचा तुरटी पावडर एक कप गरम पाण्यात मिसळा. शॅम्पूनंतर हे पाणी टाळूवर लावा.
चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा तुरटीच्या पाण्याचा वापर करा. यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि कोंडा दूर होतो.
१ चमचा तुरटी पावडर २ चमचे कोमट नारळाच्या तेलात मिसळा. हे मिश्रण टाळूवर मसाज करा.
तुरटी आणि नारळाचे तेल मिश्रण ३०-४५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर शाम्पूने धुवा. हे आठवड्यातून एकदा लावू शकता.
तुरटी थेट टाळूवर लावू नका, कारण यामुळे केस कोरडे होऊ शकतात. वापरण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा.